IGTR Short Term Courses: IGTR (इंडो जर्मन टूल रुम), भारत सरकार यांच्या अंतर्गत SC व ST प्रवर्गातील युवक व युवतींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण योजना.....
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
नेहमीप्रमाणे मी पुन्हा एकदा खास तुमच्या साठी घेऊन आलो आहे उपयुक्त अशी माहिती.
मित्रांनो आपण शेती व्यवसाय करत असताना होणाऱ्या विविध अपघातामुळे, शेतकऱ्यास मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास संबंधित अपघातग्रस्त शेतकऱ्यास विमाछञ म्हणून श्री. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवण्यात येत आहे. व या योजनेचा लाभ संबंधित शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुबीयांना देण्यात येतो.
ही योजना कोण राबवत ?
मित्रांनो श्री गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही महाराष्ट्र शासन कृषी,पशू संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यसाय हा विभाग सप्टेंबर २०१९ पासून राबवत आहे.
या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ?
या योजनेचा लाभ राज्यातील सर्व वहितिधारक शेतकरी ( ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे असे ) व वहितिधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले व्यक्ती ( आई/वडील, पती/पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी यापैकी कोणीही एक व्यक्ती ) असे १० ते ७५ वयोगटातील एकूण २ जणांना हे विमाछत्र प्रदान करण्याची योजना राबिण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा ?
१० ते ७५ या वयोगटातील राज्यातील सर्व शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील २ व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल.
या योजने अंतर्गत दिले जाणारे विमा संरक्षण ?
१. अपघाती मृत्यू - ₹ २०००००/-
२. अपघातामुळे दोन डोळे अथवा एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास - ₹ २०००००/-
३. अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास - १०००००/-
![]() |
| विमा संरक्षण तक्ता. |
टिप्पण्या