IGTR Short Term Courses: IGTR (इंडो जर्मन टूल रुम), भारत सरकार यांच्या अंतर्गत SC व ST प्रवर्गातील युवक व युवतींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण योजना.....
![]() |
| IGTR Short Term Courses |
IGTR Short Term Courses: नेहमी प्रमाणे मी तुमच्या कामाची माहिती घेऊन आलो आहे.
मित्रांनो भारत सरकारचे (IGTR) इंडो जर्मन टूल रूम छत्रपती संभाजीनगर, पुणे, भोसरी व नागपूर हे या ठिकाणी SC व ST प्रवर्गातील मधील युवक युवतींना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करत आहेत.
काय आहे ही योजना?
ही योजना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील युवक युवतींसाठी अल्प कालावधी प्रशिक्षण योजना (Short Term Courses) राबवत आहे जेणेकरून अनुसूचित जाती व जमातीमधील युवक युवतींना हे प्रशिक्षण घेऊन चांगल्या कंपनीमध्ये काम करण्याचे संधी भेटेल व त्यांना याचा फायदा होईल, यासाठी ही योजना राबवली जात आहे.
काय आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ची पात्रता?
मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे इंजिनीअरिंग ची पदवी व त्याच्या समतुल्य शिक्षण पूर्ण झालेले असावे. यामध्ये तुमचे इंजिनीअरिंग ची पदवी कोणत्याही साईट (Branch) मधून झालेलं असेल तर त्यानुसार तुम्ही कोणते प्रशिक्षण घ्यायचे ते तुम्ही ठरऊ शकता.
यामध्ये कोणते प्रशिक्षण देण्यात येते?
![]() |
| वरील फोटो मधील सर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. |
नोंदणी कशी करावी?
नोंदणी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन किंवा IGTR च्या Website वर जाऊन तुम्ही तुमची नाव नोंदणी करू शकता.
नाव नोंदणीसाठी लिंक
website: http://www.igtr-aur.org
नोंदणी फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागपत्र
- S.S.C./ 10th पास प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- इंजिनीअरिंग पदवी प्रमाणपत्र
- बँक पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
- जातीचा दाखला
- जात पडतळणी प्रमाणपत्र (आवश्यकता असेल तर)
एडमिशन घेण्यासाठी.....
प्रत्येक सोमवारी तुम्ही एडमिशन घेऊ शकता. म्हणजे प्रत्येक सोमवारी नवीन बॅच चालू होते. परंतु त्यासाठी त्यांचे जे निकष आहेत ते पूर्ण झालेले असावे लागतील. ( अपुरी विद्यार्थी संख्या असेल तर बॅच चालू करण्यास वेळही लागू शकतो.) याची नोंद घ्यावी.
यासाठी मित्रांनो तुम्हाला कोर्स नोंदणी फी रुपये 354/- मात्र भरावे लागतील.
अधिक माहिती साठी संपर्क....
- छत्रपती संभाजीनगर
मो.नं.: 9373161252 , 9373161253
ईमेल: info@igtr-aur.org
- स्वारगेट, पुणे
फो.नं.: 020-24440861 , 020-24440862
ईमेल: igtr_pune@yahoo.co.in
- भोसरी, पुणे
फो.नं.: 020-27121100 , 020-27121122
ईमेल: igtrecmsie@igtr-aur.org
- नागपूर
मो.नं.: 7104297136 , 9075095552
ईमेल: training_ngp@igtr-aur.org
वरील माहिती आवडल्यास आपल्या मित्र - मैत्रीण यांना नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल.
धन्यवाद
TATA IPL -2023 फ्री मध्ये पाहू शकता याविषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇🏻
https://sptechmarathi.blogspot.com/2023/03/tata-ipl.html
UPI वरील व्यवहार हे विनामूल्यच..... याविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇🏻
https://sptechmarathi.blogspot.com/2023/03/upi.html
अशाच वेगवेगळ्या अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप खालील link वर क्लिक करून जॉईन करा 👇


टिप्पण्या