नमस्कार मित्रांनो, आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी तुमच्या कामाची माहिती घेऊन आलो आहे.
कामगारांसाठी कामाची चांगली परिस्थिती उपलब्ध करणे तसेच त्यांचे जीवनमान सुधारणे ,धोकादायक क्षेत्रांमध्ये बालकामगारांना काम न करू देणे ,तसेच रोजगार क्षमता व रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी शाश्वत आधारावर कौशल्य विकास करणे .
सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी उपायांसाठी कार्य, कामांची स्थिती, व्यावसायिक आरोग्य आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी धोरणे / कार्यक्रम / योजना / प्रकल्प घालून आणि कामगारांच्या जीवनशैलीत सुधारणा करणे, घातक व्यवसायापासून बाल श्रम काढून टाकणे आणि प्रक्रिया, श्रम कायद्याच्या अंमलबजावणीस बळकट करणे आणि कौशल्य विकास आणि रोजगार सेवांचा प्रचार करणे.
बांधकाम व इतर बांधकाम कामगार हे सर्वात मोठ्या असंघटित वर्गात येतात कामगारांच्या रोजगार व सेवाशर्तींचे नियमन करण्याच्या उद्देशाने तसेच सुरक्षा आरोग्य व कल्याणासाठीच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने "महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार अधिनियम" पारित केला आहे. मंडळाचा मुख्य उद्देश हा विविध योजनांद्वारे इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे.
तर मित्रांनो काय आहे ही योजना?
या योजनेचा मुख्य उद्देश हा बांधकाम कामगारांचे भविष्य उज्वल बनविणे हा आहे. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना योग्य असा रोजगार उपलब्ध करून देणे व त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी आर्थिक सहाय्य करणे आणि यांसारखे अनेक लाभ या योजनेअंतर्गत कामगारांना आर्थिक मदत म्हणून दिले जातात.
बांधकाम कामगार या योजनेचे उद्दिष्ट?
- राज्यातील बांधकाम कामगार यांच्यासाठी विविध योजना राबविणे व त्यांना यापासून आर्थिक लाभ मिळावा जेणेकरून त्यांचे व त्यांच्या पाल्यांचे भविष्य उज्वल होईल हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- या योजनेतून जे नवीन बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- या योजनेविषयी ची माहिती बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचविणे.
- कामगारांच्या योजनांमध्ये सुलभपणा आणणे.
- बांधकाम कामगारांची नोंद वाढवण्यासाठी कामाच्या जागेवर जाऊन नोंदणी करणे.
- लाभाची रक्कम ही बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात जमा करणे.
- बांधकाम मजुरांच्या नोंदणीच्या मान्यतेसाठी अधिकाऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया पार पाडणे.
बांधकाम कामगार योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
या योजनेचा लाभ हा राज्यातील प्रत्येक बांधकाम कामगार घेऊ शकतो जो इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करत आहे असा प्रत्येक पुरुष व स्त्री या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
बांधकाम व इतर बांधकाम योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व कामाची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
बांधकाम कामगार योजनेचे फायदे काय आहेत?
महाराष्ट्र शासन बांधकाम कामगार योजना अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारास खालील योजनांचा लाभ घेता येईल.
१. सामाजिक सुरक्षा योजना
या योजनेअंतर्गत खालील लाभ घेता येतील.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाह खर्चासाठी रु ३००००/- अर्थसहाय्य दिले जाते. अर्ज डाऊनलोड करा
- व्यक्तिमत्व विकास या पुस्तकांचे मोफत वाटप केले जाते. अर्ज डाऊनलोड करा
- नोंदणीकृत बांधकाम कामगारास अवजारे / हत्यारे खरेदीसाठी रु ५०००/- अर्थसाह्य दिले जाते. अर्ज डाऊनलोड करा
- बांधकाम कामगारास प्रधानमंत्री जीवन ज्योती विमायोजनेचा लाभ मिळतो. अर्ज डाऊनलोड करा
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ मिळतो. अर्ज डाऊनलोड करा
- बांधकाम कामगारास कौशल्य विकासासाठी कौशल्य वृद्धीकरण योजना राबवली जाते. अर्ज डाऊनलोड करा
२. शैक्षणिक योजना
या योजनेअंतर्गत खालील लाभ घेता येतील.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना १ ली ते ७ वी साठी प्रतिवर्षी रु २५००/- व ८ वी ते १० वी साठी प्रतिवर्षी रु ५०००/- अर्थसाह्य दिले जाते. अर्ज डाऊनलोड करा
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता १० वी व १२ वी मध्ये 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाल्यास रु १००००/- अर्थसाह्य म्हणून दिले जातात. अर्ज डाऊनलोड करा
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता ११ वी व १२ वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी रु १००००/- अर्थसाह्य दिले जाते. अर्ज डाऊनलोड करा
- बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना व पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या पुस्तके व शैक्षणिक सामग्री साठी प्रति वर्षे रु २००००/- अर्थसाह्य दिले जाते. अर्ज डाऊनलोड करा
- बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना व पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी प्रति वर्षी रु १ लाख व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी रु ६००००/- अर्थसाह्य दिले जाते. अर्ज डाऊनलोड करा
- बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना शासनमान्य पदविकेसाठी प्रतिवर्षी ₹ २००००/- व पदव्युत्तर पदविका करिता रु २५०००/- अर्थसाह्य दिले जाते. अर्ज डाऊनलोड करा
- बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना संगणकाच्या शिक्षणासाठी (MSCIT) संपूर्ण फीस अर्थसाह्य म्हणून दिली जाते. अर्ज डाऊनलोड करा
३. आरोग्य विषयक योजना
या योजनेअंतर्गत खालील लाभ घेता येतील.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन जीवित अपत्यांच्या नैसर्गिक प्रसूतीसाठी रु १५०००/- व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी रु २००००/- अर्थसाह्य दिले जाते. अर्ज डाऊनलोड करा
- नोंदणीकृत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी रुपये १ लाख अर्थसहाय्य दिले जाते. (आरोग्य विमा लागू नसल्यास) अर्ज डाऊनलोड करा
- पती किंवा पत्नीने पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया नसबंदी केल्यास त्या मुलीच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत मुलीच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत रुपये १ लाख मुदत बंद ठेव (फिक्स डिपॉझिट ) ठेवण्यात येते. अर्ज डाऊनलोड करा
- नोंदणीकृत बांधकाम कामगारास ७५% अपंगत्व आल्यास रुपये २ लाख अर्थसहाय्य दिले जाते. अर्ज डाऊनलोड करा
- नोंदणीकृत बांधकाम कामगारास महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येतो. अर्ज डाऊनलोड करा
४. अर्थ सहाय्य योजना
या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारास खाली योजनांचा लाभ घेता येईल.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसास रु ५ लाख अर्थसाह्य दिले जाते. ( बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास ठेकेदाराचे किंवा इंजिनियर चे पत्र देणे आवश्यक आहे.) अर्ज डाऊनलोड करा
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास रु २ लाख अर्थसहाय्य दिले जाते. अर्ज डाऊनलोड करा
- नोंदणीकृत बांधकाम कामगारास घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधकाम करण्यासाठी 4.5 लाखापर्यंत अर्थसाह्य दिले जाते. ( केंद्र शासन २ लाख रुपये व कल्याणकारी मंडळ २.५ लाख रुपये मदत करते.) अर्ज डाऊनलोड करा
- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांचे नाव यादीत असेल तर रु २ लाख पर्यंत अर्थसाह्य दिले जाते. अर्ज डाऊनलोड करा
- नोंदणीकृत बांधकाम कामगार चा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा स्री कामगाराचा मृत्यू झाल्यास तिच्या विधुर पतीस रुपये २४ हजार पाच वर्षांसाठी अर्थसहाय्य दिले जाते. प्रतिवर्षी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज डाऊनलोड करा
बांधकाम कामगार म्हणून नोंद करण्यासाठी पात्रता निकष
- बांधकाम कामगार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे व त्याच्याकडे रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा 18 ते 60 वर्ष या वयोगटातील असला पाहिजे.
- अर्जदाराने मागील एक वर्षांमध्ये कमीत कमी 90 दिवस किंवा ( तीन महिने ) बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे तसे ठेकेदार किंवा इंजिनिअर यांच्याकडून पत्र घ्यावे.
- कामगाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख रुपये पेक्षा जास्त नसावे.
- बांधकाम कामगाराने बांधकाम कामगार म्हणून इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंद केलेली असणे बंधनकारक आहे.
- या योजनेचा लाभ हा बांधकाम कामगाराच्या फक्त पहिल्या दोन अपत्यांसाठी घेता येईल.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र
- नोंदणी अर्ज. डाऊनलोड फॉर्म
- वयाचा पुरावा (शाळा सोडलेला दाखला/आधार कार्ड/पॅन कार्ड )
- बांधकाम कामगार म्हणून 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ठेकेदार किंवा इंजिनिअर यांचे.
- ओळखपत्र पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इलेक्शन कार्ड )
- पासपोर्ट आकाराचे ३ फोटो.
- महानगरपालिका यांच्याकडून बांधकाम मजूर असल्याचे प्रमाणपत्र.
- ग्रामसेवक यांच्याकडून बांधकाम मजूर असल्याचे प्रमाणपत्र.
- पत्ता पुरावा ( रहिवासी दाखला )
- पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड .
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- ज्या ठिकाणी काम करत आहे त्या ठिकाणचा पत्ता ( ठेकेदार किंवा इंजिनिअर यांच्याकडून घ्यावा )
- नोंदणी फी २५/- रुपये व पाच वर्षांसाठी वार्षिक वर्गणी ६०/- रुपये.
बांधकाम कामगार म्हणून नोंद करण्यासाठी खालील पद्धतीने अर्ज करावा
नवीन बांधकाम कामगार म्हणून नोंद करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या www.mahabocw.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
त्यानंतर मुखपृष्ठावर गेल्यानंतर बांधकाम कामगार नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे. बांधकाम कामगार नोंदणी हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला खालील माहिती भरावी लागेल.
- जवळचे स्थान निवडा( या ठिकाणी आपला जिल्हा प्रविष्ट करावा)
- आधार क्रमांक प्रविष्ट करा.
- चालू असलेला मोबाईल क्रमांक प्रविष्ट करावा.
त्यानंतर Process to form या बटनावर क्लिक करावे. तुमच्यासमोर आता बांधकाम कामगार नोंदणीचा अर्ज ओपन होईल त्यामध्ये खालील प्रमाणे सर्व माहिती भरावी
- वैयक्तिक माहिती
- कायमचा पत्ता
- कौटुंबिक माहिती
- बँक तपशील
- नियुक्ता तपशील ( ठेकेदार किंवा इंजिनिअर यांची माहिती )
- समर्थन दस्तऐवज ( तुम्हाला अर्जासोबत जोडण्यासाठी लागणारे सर्व कागदपत्र )
वरील सर्व माहिती भरून झाल्यानंतर Save या बटनावर क्लिक करावे त्यानंतर तुमचा बांधकाम कामगार म्हणून अर्ज नोंदविला जाईल.
दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
मुखृष्ठावरील दाव्यासाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.
आता तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये Select Action या पर्यायवर क्लिक करा. त्यामधील New Claim ( नवीन नोंद करण्यासाठी ) वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक ( Resistration No) प्रविष्ट करावा लागेल आणि त्यानंतर Proceed to Form या बटनावर क्लिक करा.
आता तुमच्यासमोर दावा अर्ज ओपन होईल त्यामधील सर्व माहिती अचूक भरून अर्ज सबमिट करा. या पद्धतीने तुमची दावा अर्ज प्रक्रिया पुर्ण होईल.
ऑनलाइन नोंदणीचे नूतनीकरण कसे करावे ?
मुखपृष्ठावरील ऑनलाइन नोंदणीचे नूतनीकरण करणे या पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये Select Action मध्ये Update Renewal या पर्यावर क्लिक करा.
आता तुमच्यासमोर आणखी एक नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये तुमचा एक पोच पावती क्रमांक ( Acknowledgement No ) व Resistration No टाका व Proceed to Form या बटणावर क्लिक करा आता तुमच्यासमोर तुमचा नूतनीकरणाचा फॉर्म ओपन होईल त्यामध्ये सर्व माहिती अचूक भरून अपडेट करा अशाप्रकारे तुमच्या नोंदणीचे नूतनीकरण होईल.
प्रोफाइल कशी अपडेट करावी ?
प्रोफाइल अपडेट करण्यासाठी मुखपृष्ठावरील प्रोफाइल लॉगिन करा या पर्यायावर क्लिक करा.
आता तुमच्यासमोर नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये तुमचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा आणि त्यानंतर Proceed to Form या बटनावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर प्रोफाइल अपडेट करण्याचे विंडो ओपन होईल त्यामधील माहिती अचूक भरून प्रोफाइल अपडेट करा.
नोंदणी फि कशी भरावी ?
नोंदणी फी भरण्यासाठी मुखपृष्ठावरील उपकरण भरणा या पर्यायावर क्लिक करा आता आपल्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल त्यामधील User ID व Password टाकून साइन इन या बटनावर क्लिक करा व त्यानंतर च्या पेजवरील माहिती भरून आपली नोंदणी फी भरा.
अशाप्रकारे आपण आपली माहिती भरून बांधकाम कामगार म्हणून नोंदणी ची संपूर्ण प्रोसेस पूर्ण करू शकता.
फॉर्म भरताना काही अडचण आल्यास तुम्ही खालील क्रमांक क्रमांकावर संपर्क साधू शकता
022-26572631
022-26572632
Email id: bocwwboardmaha@gmail.com
Toll free: 18008892816
मित्रांनो आशा करतो की दिलेली माहिती ही तुमच्या उपयोगी पडेल आणि यामध्ये काही त्रुटी असतील तर तिला मानवीय चूक समजावी व आम्हाला मेल द्वारे कळवावे ती चूक लवकरात लवकर सुधारण्यात येईल.
धन्यवाद.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना विषय अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://sptechmarathi.blogspot.com/2023/03/blog-post.html
महज्योती व IGTR यांच्या संयुक्त विद्यमाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विनामूल्य कौशल्य प्रशिक्षण योजने विषयी माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://sptechmarathi.blogspot.com/2023/03/SPTechMarathi%20.html
टिप्पण्या