IGTR Short Term Courses: IGTR (इंडो जर्मन टूल रुम), भारत सरकार यांच्या अंतर्गत SC व ST प्रवर्गातील युवक व युवतींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण योजना.....

इमेज
  IGTR Short Term Courses  नमस्कार मित्रांनो,           IGTR Short Term Courses: नेहमी प्रमाणे मी तुमच्या कामाची माहिती घेऊन आलो आहे.           मित्रांनो भारत सरकारचे (IGTR) इंडो जर्मन टूल रूम छत्रपती संभाजीनगर, पुणे, भोसरी व नागपूर हे या ठिकाणी SC व ST प्रवर्गातील मधील युवक युवतींना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करत आहेत.  काय आहे ही योजना?          ही योजना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील युवक युवतींसाठी अल्प कालावधी प्रशिक्षण योजना (Short Term Courses) राबवत आहे जेणेकरून अनुसूचित जाती व जमातीमधील युवक युवतींना हे प्रशिक्षण घेऊन चांगल्या कंपनीमध्ये काम करण्याचे संधी भेटेल व त्यांना याचा फायदा होईल, यासाठी ही योजना राबवली जात आहे. काय आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ची पात्रता?          मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे इंजिनीअरिंग ची पदवी व त्याच्या समतुल्य शिक्षण पूर्ण झालेले असावे. यामध्ये तुमचे इंजिनीअरिंग ची पदवी कोणत्याही साईट (Branch) मधू...

Mahajyoti Yojana : महाज्योती, नागपूर व आयजिटीआर (IGTR), छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने OBC, SBC, व VJNT या युवक - युवती साठी विनामूल्य कौशल्य विकास प्रशिक्षण योजना.

 नमस्कार मित्रांनो


सध्याच्या काळात जॉब ची गरज कोणाला नाही? तर सर्वांना आहे परंतु त्यासाठी तुमच्याकडे काहीतरी टेक्निकल स्किल पाहिजे. त्यासाठी तुम्हाला समाजापेक्षा वेगळं काहीतरी शिकण्याची किंवा करण्याची गरज आहे. जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर जॉब मिळेल. 

त्यासाठीच, महाज्योती, नागपूर व आयजीटीआर (IGTR), छत्रपती संभाजीनगर यांनी मिळून तुमच्यासाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण योजना राबवत आहेत.

काय आहे योजना? 

ही योजना इतर मागास वर्ग (OBC), विशेष मागास वर्ग (SBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJ-NT) च्या " नॉन क्रिमीलेअर" प्रवर्गातील युवती व युवती साठी पूर्णवेळ प्रशिक्षण व त्याचबरोबर राहणे व जेवण याची सुविधा सुद्धा विनामूल्य देण्यात येणार आहे. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी वय व शिक्षण?

तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कमीत कमी १० वी पास असणे गरजेचे आहे. 

1. १०वी पास (SSC2. I.T.I. (सर्व ट्रेड)

3. Engineering Diploma (सर्व ब्रांच)

4. Engineering Degree (सर्व ब्रांच)

या योजनेसाठी वरील शिक्षण ग्राह्य धरले जाईल. व त्याआधारे तुम्हाला तुमच्या शिक्षणानुसार तुम्हाला एडमिशन देण्यात येईल

यासाठी वयाची अट १८ ते ३५ वर्ष आहे.


कोणते प्रशिक्षण देण्यात येईल?

वरील फोटो मध्ये कोर्स चे नाव, शिक्षण, प्रशिक्षणाचा कालावधी आणि जागा विषयी माहिती दिली आहे.













नोंदणी कशी करावी?

नोंदणी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन किंवा IGTR च्या website वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता.

 त्यानंतर आलेल्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.


Registration साठी Website 

http://www.igtr-aur.org/


अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागपत्र.

१. शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्र(१०वी, १२वी,I.T.I., Diploma, Degree ई.)

२. जातीचे प्रमाणपत्र.

३. शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला.

४.नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र.

५.जन्म दाखला.

६. महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी दाखला.

७.आधार कार्ड.

८. स्वतःचे ५ फोटो.

९. मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र ( कोणत्याही MBBS किंवा MD डॉक्टर चे चालेल).

एडमिशन कसे घ्यावे?

तर मित्रांनो या ठिकाणी तुमचे पात्र उमेदवाराच्या यादीमध्ये नाव आले तर तुम्हाला एडमिशन घेण्यासाठी एक पात्रता प्रवेश परीक्षा व मुलाखत द्यावी लागणार आहे. परंतु ती परीक्षा एकदम सोप्या पद्धतीने घेण्यात येईल.

ती परीक्षा इंग्रजी, गणित व सामान्यज्ञान या विषयावर आधारित असून ती १०वी च्या विषयांच्या समतुल्य असेल.

परीक्षा पास झाल्यानंर तुम्हाला एडमिशन देण्यात येईल व तुमची राहणे व जेवण याची सोय केली जाईल.

अधिक माहितीसाठी संपर्क

- 0240-2610100

- 9373161252

- 9373161253


 वरील माहिती आवडल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल. लाईक करा शेअर करा आणि सब्क्राईब करा व काही अडचण आल्यास कॉमेंट करा.

धन्यवाद मित्रांनो.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

IGTR Short Term Courses: IGTR (इंडो जर्मन टूल रुम), भारत सरकार यांच्या अंतर्गत SC व ST प्रवर्गातील युवक व युवतींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण योजना.....

UPI Transaction Free: UPI वरील व्यवहार हे विनामुल्यच....

मा.श्री गोपीनाथराव मुंडे साहेब शेतकरी अपघात विमा योजना

Bandhkam Kamgar Yojana: महाराष्ट्र शासन बांधकाम कामगार योजना

TATA IPL पाहा आता ! ते ही फ्री मध्ये.....